निवडणूक आयोगाकडून फलटण तालुक्यातील अंतिम मतदार यादी प्रसिध्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगाकडून दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

या मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या ३,३३,०१८ असून या यादीत २,२२६ नवीन मतदारांची वाढ झाली आहे. या यादीमध्ये पुरूष मतदारांची संख्या १,७०,६४१ असून पुरूष मतदारांमध्ये ३३५ मतदारांची संख्या घटलेली आहे, तर महिला मतदार १,६२,३६३ असून महिला मतदारांची संख्या २,५६० ने वाढलेली आहे. इतर मतदारांची एकूण संख्या १४ असून यामध्ये १ मतदाराची वाढ झाली आहे.

वयोगटानुसार मतदारांमध्ये १८ ते ३९ वयोगटामध्ये नवमतदारांची संख्या वाढलेली आहे. या वयोगटात एकूण मतदारांची संख्या १,३१,०२९ असून यामध्ये १२,८१७ मतदारांची संख्या वाढलेली आहे, तर ४० ते ८० वर्षे व त्यावरील वयोगटात मतदारांची संख्या घटलेली आहे. या वयोगटात २,०१,९८९ एकूण मतदारांची संख्या असून १०,५९१ मतदारांची संख्या घटली आहे.

या मतदारयादीत लिंग गुणोत्तर ९५१ असून लिंग गुणोत्तरात १६ ने वाढ झालेली आहे. तसेच फलटण तालुयात एकूण मतदान केंद्रांची संख्या ३४१ आहे.

या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार यांची जास्तीत जास्त संख्या वाढविण्यासाठी विशेष ग्रामसभा यांचे आयोजन करून सन २००२ ते २००५ अखेर जन्मनोंदी असलेल्या बालकांची यादी बनवण्यात येऊन ज्यांचे दि. ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची नावनोंदणी करण्यामध्ये भर देण्यात आला आहे. त्यानुसार फलटण शहरमध्ये एकूण १५,१२० तर फलटण ग्रामीणमध्ये ७,५०१ नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.

तसेच ग्रामसभा अंतर्गत सन २०१९ ते २०२३ अखेर मयत नोंद असलेल्या नागरिकांची संख्या प्राप्त करण्यात येऊन मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. यामध्ये फलटण शहर येथे ३११५ नागरिकांची तर फलटण ग्रामीण येथे ९४५७ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भटके विमुत जमाती, ट्रान्सजेंडर, अपंग व्यती, तरुण, महिला इ.साठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खराडेवाडी, फलटण, वडले, खामगाव येथे ही शिबिरे घेण्यात आली. तसेच तृतीयपंथी, दिव्यांग मतदार, महिलांसाठी विशेष शिबिरे घेण्यात आली.

ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये १८ ते १९ वयोगटात ४५०९ अर्ज, तर २० ते २९ वयोगटातील ७१३२ अर्ज प्राप्त झाले.

अद्यापही ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशांसाठी राजकीय पक्षांनी बीएलए यांची नियुती करावी.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वी सदरचा एसएसआर कार्यक्रम हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली नावे मतदार यादीमध्ये आहेत वा नाहीत ते तपासावे. जर आपले नाव नसेल तर ते मतदार यादीत समाविष्ठ करण्यासाठी नमुना नं. ६ चा अर्ज भरून द्यावा. जर एखाद्या मतदाराचे नाव अनावधानाने कमी झाले असले तर त्यांनी नमुना नं. ६ भरून या कार्यालयास सादर करावा किंवा आपले मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा अथवा ऑनलाईन ‘वोटर हेल्पलाईन’ मोबाईल अ‍ॅप, ‘वोटर पोर्टल’ या संकेतस्थळावरून मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!