दैनिक स्थैर्य | दि. 24 जानेवारी 2024 | फलटण | लोकसभा निवडणूक ही आगामी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने व सातारचे जिल्हाधिकारी जिंतेंद्र दुडी यांनी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूकपूर्व कामकाज सुरू आहे. यामध्ये फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे ऑन फिल्ड फिरत असून फलटण तालुक्यातील सरडे येथील मतदान केंद्राची तपासणी केली आहे.