शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा कारखान्याचे ध्येय; आ. शिवेंद्रसिंहराजे; एफआरपी ३०४३ रु., पहिली उचल २६०० रुपये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, सातारा, दि.३: सातारा तालुका आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम व्हावा आणि शेतकर्‍याने पिकवलेल्या ऊस पिकाला किङ्गायतशीर दर मिळावा हे स्वप्न उराशी बाळगून स्व. भाऊसाहेब महाराजांनी अनंत अडचणींवर मात करुन सभासदांच्या साथीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना उभा केला. आज ही संस्था पुर्णपणे आर्थिक सक्षम आणि भक्कम आहे. सभासद शेतकर्‍यांना किङ्गायतशीर दर देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले असून शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, कारखान्याची एफआरपी रक्कम प्रतिटन ३ हजार ४३ रुपये असून गाळपास येणार्‍या ऊसाला एङ्गआरपीनुसार संपुर्ण पेमेंट वेळेत अदा केले जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. 

कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने सुरु असून उत्पादीत झालेल्या १ लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हा.चेअरमन विश्‍वास रामचंद्र शेडगे, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जि.प.सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंंद्रकांत जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती वनिता गोरे, बाजार समितीचे सभापती विक‘म पवार, माजी सभापती लालासाहेब पवार, रामचंद्र जगदाळे, पंचायत समिती सभापती सौ.सरिता इंदलकर, उप सभापती अरविंद जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

हंगाम चालू झाल्यापसून ते दि.०२/१२/२०२० अखेर १,२१,२९० मे.टन गाळप झाले असून सरासरी साखर उतारा १०.७०% इतका आहे. कारखान्याचे दैनंदिन गाळप ४५०० मे.टन क्षमतेने सुरु असून एका महिन्यात १,१२,६८० मे.टन इतके गाळप झाले आहे. कारखान्याने दि.०४.११.२०२० ते २०.११.२०२० अखेर गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल रू.२६००/- प्र.मे.टनाप्रमाणे रू.१७ कोटी ९० लाख ७५ हजार इतकी रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कारखाना एङ्ग.आर.पी रू.३,०४३ प्र.मे.टन इतकी असून एङ्गआरपी प्रमाणे संपूर्ण पेमेंट ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना देण्यास कारखाना व्यवस्थापन कटिबध्द आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. 

कारखान्याने बी-हेवी मोलॅसिस पासून ४० लाख लिटर इथेनॉल टेंडर भरलेले आहे व त्याचा ऑईल कंपन्यांना पुरवठा दि.०१ डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आला आहे. तसेच कारखान्याने बी-हेवी मोलॅसिस १७,००० मे.टन विक‘ी केले असून त्याचीही डिलीव्हरी चालू आहे. त्यामुळे कारखान्यास पैसे वेळेत उपलब्ध होऊन शेतकर्‍यांना ऊस बिल वेळेत देण्यास मदत होणार आहे. शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या धोरणानुसार अशा प्रकारचा निर्णय जिल्ह्यात प्रथम अजिंक्यतारा कारखान्यामार्फत घेतला आहे. कारखाना व्यवस्थापनाचे योग्य आर्थिक नियोजन, मशिनरी मध्ये वेळोवेळी केलेले तांत्रिक बदल यासह नोंद केलेल्या ऊसाचे तोडणी प्रोग‘ाम अचूकपणे राबविण्यात येत असून सभासद, शेतकर्‍यांच्या सहकार्याने यंदाचा हंगामही यशस्वीपणे पुर्ण होणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. 

कार्यक‘मास पंचायत सभापतीचे माजी सभापती मिलिंद कदम, माजी उपसभापती जितेंद्र सावंत, अरविंद चव्हाण, दादा शेळके, विद्यमान सदस्य राहूल शिंदे, जिल्हा खरेदी विक‘ी संघाचे अध्यक्ष ऍड.सुर्यकांत धनावडे, वाहतूक संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण फडतरे, तालुका खरेदी विक‘ी संघाचे माजी अध्यक्ष गणपतराव शिंदे, संचालक दिलीपराव फडतरे, अजिंक्यतारा सुत गिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, उपाध्यक्ष बळीराम देशमुख, माजी अध्यक्ष पंडितराव सावंत, माजी उपाध्यक्ष गणपतराव मोहिते, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक सदस्य, युनियन अध्यक्ष श्री.धनवे, अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी अधिकारी, अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!