संभाजी घोरपडे यांच्या मृत्युने अनेकांना धक्का

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, चिमणगाव, ता.कोरेगाव, दि.५: संभाजी शंकर घोरपडे यांचा मृत्यु मनाला चटका लावून जाणारा ठरला आहे. शिरढोण येथील शेतकरी कुटुंबातील घोरपडे यांनी स्वत:ला जरंडेश्‍वर साखर कारखान्यासाठी वाहून घेतले होते. कारखाना उभारणीवेळी भागभांडवल जमा करण्यापासून ते अहोरात्र काम करत होते. चाचणी गळीत हंगामामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील त्यावेळच्या व्यवस्थापनाने केला होता. अत्यंत शांत व संयमी असलेले संभाजी घोरपडे हे सर्वपरिचित होते. गावच्या सर्वांगिण विकासामध्ये त्यांचे योगदान होते. कारखान्यातील अन्य कामगारांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांचे कुटुंब स्थिरस्थावर असून, मुलगा व सून पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी करत असून, कन्या देखील पुण्यात स्थायिक झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा हार्ट ऍटेकने मृत्यु झाल्यानंतर ते मानसिकरित्या खचले होते. आपले दु:ख बाजूला सारुन ने अत्यंत चांगल्याप्रकारे कारखान्यात काम करत होते. त्यांच्या अचानक मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे. संपूर्ण शिरढोण गावावर शोककळा पसरली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!