
दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे कार नदीत कोसळून सात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.