प्रचाराचा ‘दिस’ मावळणार, पण विजयाचा ‘सूर्य’ रणजितसिंहांच्या रूपाने उगवणार!


स्थैर्य, फलटण, दि. ०५ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज अधिकृत शेवटचा दिवस आहे. आज (बुधवारी) रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र, प्रचाराची सांगता होण्यापूर्वीच फलटणच्या राजकीय आखाड्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) चे पारडे स्पष्टपणे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, रणजितसिंहांच्या ‘विकासकामां’च्या झंझावातासमोर राजे गटाचा निभाव लागणे कठीण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांवर ‘कमळ’ आणि ‘घड्याळ’ सुसाट सुटले असून, मतदारांनी आधीच महायुतीच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

का आहे रणजितसिंहांचे पारडे जड?

प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्देच उरले नाहीत. दुसरीकडे, रणजितसिंहांनी केलेल्या कामांची यादी मतदारांच्या मुखी आहे:

१. पाण्याचा प्रश्न मिटवला: नीरा-देवधरचे पाणी फलटणच्या दुष्काळी भागात आणून त्यांनी शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्यांचा वनवास संपवला.

२. प्रशासकीय क्रांती: फलटणमध्ये उभी होणार असलेली भव्य प्रशासकीय इमारत, पोलीस वसाहती आणि रस्ते विकासाचे जाळे हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.

३. युतीची ताकद: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने, तसेच फलटण तालुक्यातील विविध गावांमधून युवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने रणजितसिंहांचे नेतृत्व स्वीकारल्याने महायुतीची ताकद दुप्पट झाली आहे.

विरोधकांची ‘केविलवाणी’ धडपड

राजे गटाकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला मतदारांनी साफ नाकारले आहे. “विकास हवा असेल तर रणजितसिंहांच्या पाठीशी उभे राहा,” हा विचार आता घराघरात पोहोचला आहे.

आज रात्री १० वाजता प्रचार थांबेल, पुढचे काही तास शांततेचे असतील. पण ही शांतता ‘महायुती’च्या मोठ्या विजयाची नांदी आहे. विधानसभेत सचिन पाटील, नगरपालिकेत समशेरसिंह आणि आता जिल्हा परिषदेत महायुतीचे शिलेदार, असा ‘ट्रिपल इंजिन’ विकासाचा फॉर्म्युला फलटणकरांनी डोक्यावर घेतला आहे. त्यामुळे, मतमोजणीची केवळ औपचारिकता बाकी असून, निकाल रणजितसिंहांच्याच बाजूने लागणार, यावर आजच्या शेवटच्या दिवशी शिक्कामोर्तब झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!