स्थैर्य, ढेबेवाडी, दि.१५: माथाडी कामगारांच्या लाक्षणिक
संपाची दखल घेऊन येत्या 24 तारखेला राज्य शासनाने बैठक आयोजिली आहे. त्यात
प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न केल्यास नव्या वर्षाच्या प्रारंभीच
कामगारांना न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते
माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी साेमवारी कामगारांच्या सभेत बोलताना दिला.
दरम्यान माथाडी कामगारांचा बेमुदत संप स्थगित केल्याचेही त्यांनी या वेळी
जाहीर केले.
राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या मागण्या व प्रश्नांकडे
लक्ष वेधण्यासाठी राज्यातील तमाम माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप साेमवारी
पुकारण्यात आला हाेता. मुंबई येथील माथाडी भवनसमोर झालेल्या सभेत नरेंद्र
पाटील यांनी कामगारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”माथाडी कामगारांच्या
न्याय्य प्रश्नांची अनेक निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
कामगारमंत्री, पणनमंत्री यांच्याकडे सादर केली. शासनाचे त्याकडे लक्ष
वेधण्यासाठी संप- आंदोलनेही केली. काही वेळा संयुक्त बैठका झाल्या; परंतु
माथाडी कामगारांच्या प्रश्नांची अद्याप सोडवणूक झालेली नाही. माथाडी
कामगारांना कोविड- 19 संबंधित विमा संरक्षण द्यावे. अत्यावश्यक सेवेतील
घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या रेल्वेने प्रवास
करण्याकरिता क्युआरकोड रेल्वे पास, तिकीट मिळावे. माथाडी सल्लागार समितीची
पुनर्रचना करून त्यावर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक
करावी.