स्थैर्य, सातारा, दि.१५: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्वनिर्धारित किमान वेतन अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व सरपंच, ग्रामसेवकास आदेश द्यावेत, त्यासाठी लागणाऱ्या अनुदानाची ग्रामविकास विभागाकडे मागणी करावी, या मागणीकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाने नुकतेच जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
यासंदर्भात संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले, की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्यात आले आहेत. हा किमान वेतन दर 10 ऑगस्ट 2020 पासून लागू झाले आहेत. किमान वेतन दर सात वर्षांनंतर पुनर्निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामुळे तातडीने कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून शासनाचे आदेश नाहीत, असे कारण सांगून ग्रामपंचायतीमध्ये अधिसूचनेची अंमलबजावणी केली जात नाही. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व सरपंच, प्रशासक व ग्रामसेवकांना आदेश द्यावेत.