इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली, आता 31 डिसेंबरपर्यंत फाइल करु शकणार


 

स्थैर्य, दि.२४:  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न भरण्याची अखेरची
तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना आपल्या रिटर्नसोबत ऑडिट रिपोर्ट
लावावी लागत नाही, ते 2019-20 साठी आपले रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत जमा करु
शकतात. पहिले यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 ठरवण्यात आली होती.

वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या
माहितीनुसार करदात्यांसाठी आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी
2021 निश्चित करण्यात आली आहे, ज्यांच्या रिटर्न्सचे ऑडिट करावे लागेल.

अनेकवेळा पुढे ढकलली आहे तारीख

यापूर्वी
मेच्या सुरुवातीस सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तिकर परताव्याची
अंतिम तारीख 31 जुलै ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली. आता ती 31
डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वित्त वर्ष 2018-19 साठी 30 नोव्हेंबरपर्यंत दाखल करायची आहे आयटीआर

कोरोना
काळात केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा देत आर्थिक वर्ष 2018-19 साठी
आयकर रिटर्न भरण्यासाठी डेडलाइनला 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी
याची अखेरची तारीख 30 सप्टेंबर करण्यात आली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!