इंग्लंड व न्युझीलंडवरून आलेल्यांचे अहवाह पॉझिटिव्ह; डॉ. सुभाष चव्हाण यांची माहिती
दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण येथे दक्षिण आफ्रिकेतील युगांडातुन आलेल्या चौघांची तर इंग्लंड व न्यूझीलंड आलेल्या दोघांची अशी एकुण सहा परदेशी प्रवाशांचे नमुने आज दि. १३ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे तपासण्यात आले असुन त्यामध्ये युगांडातुन आलेल्या तीन प्रवाशांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच इंग्लंड व न्यूझीलंड मधून आलेले प्रत्येकी एक संशयीत अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती सातारा जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले की, उद्या दि. १४ डिसेंबर रोजी परदेशातुन आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने GWS साठी NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. फलटण येथे युगांडातुन आलेले चार प्रवासी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तीन प्रवासी पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.