मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय दिलासा देणार हे जाहिर करा – प्रकाश आंबेडकर


 

स्थैर्य, दि.१८: राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हे पाण्यात वाहून केले. अनेकांची पीके ही आडवी झाली आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले आहेत. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. याचा सर्वात मोठा तोटा शेतकऱ्यांना झाला. यासोबतच अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे साठवणूक केलेले अन्नधान्य भिजले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!