बौद्धजन पंचायत समितीची मध्यवर्ती काँसिल सभा उत्साहात संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समितीची मध्यवर्ती काँसिल सभा सरसेनानी मा. सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई येथे मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सदर काँसिल सभेस उपसभापती विनोदीजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. तांबे, चंद्रमनी तांबे, नागसेन गमरे, अंकुश सकपाळ आदी कार्यकारी मंडळ, व्यवस्थापक मंडळ, सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, सदर प्रसंगी मा. आनंदराज आंबेडकरांनी समितीचा ६७ वा वार्षिक अहवाल सादर केला जो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला, त्याचबरोबर सदर सभेत समिती अधिक गतिमान कशी करण्यात येईल यावर पुढील ध्येय धोरण ठरवण्यात आले, तसेच आजवर शाखेच्या पाच पुरुष पदाधिकाऱ्यांनाच मतदानाचे व प्रमुख पदाधिकाराचे अधिकार होते परंतु सदर काँसिल सभेत महिला पदाधिकाऱ्यांना ही शाखेचे पाच पदाधिकारी होण्याचे प्रस्ताव सभापती आनंदराज आंबेडकर यांनी मांडला असता उपस्थितांनी उस्फूर्तपणे प्रस्तावाचे स्वागत करून सदर सर्वांनुमते त्याला पाठींबा देत ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करून घेतला.

सरतेशेवटी पुन्हा सर्व निर्णयांचे अवलोकन करून, सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून सभा संपन्न केली.

Back to top button
Don`t copy text!