मातृदिनाकरिता द बॉडी शॉपची व्यापक गिफ्टिंग रेंज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२३ । मुंबई । द बॉडी शॉप या ब्रिटनमध्ये स्थापित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय, एथिकल ब्युटी ब्रॅण्डने मातृदिनानिमित्त व्यापक गिफ्टिंग रेंज सादर केली आहे. या गिफ्टिंग रेंजमध्ये ब्लूम अॅण्ड ग्लो ब्रिटीश रोझ मिनी गिफ्ट, लॅथर अॅण्ड स्लॅथर ब्रिटीश रोझ गिफ्ट केस, जॉली अॅण्ड ज्यूसी स्ट्रॉबेरी एसेन्शियल्स गिफ्ट, हॅप्पी अॅण्ड हायड्रेटेड व्हिटॅमिन ई स्किनकेअर गिफ्ट, रिच अॅण्ड क्रीमी अॅवोकॅडो एसेन्शियल्स गिफ्ट, प्रोटेक्ट अॅण्ड सॉफ्टन हँड बाम ट्रिओ, सूथ अॅण्ड स्मूथ आल्मंड मिल्क एसेन्शियल्स गिफ्ट आदी उत्पादनांचा समावेश आहे. या कलेक्शनमधील उत्पादनांमध्ये हाताने निवडलेल्या घटकांचा समावेश आहे जसे ब्रिटीश रोझ, ज्यामधून फुलांचा सुगंध येतो आणि ही उत्पादने वर्षभर वापरासाठी उपयुक्त आहेत.

ब्लूम अॅण्ड ग्लो ब्रिटीश रोझ मिनी गिफ्ट:

दिवसभरातील कामानंतर आराम करण्यासोबत स्वत:ची काळजी घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तुमची आई त्यामध्ये अपवाद नाही. द बॉडी शॉपच्या ब्लूम अॅण्ड ग्लो ब्रिटीश रोझ मिनी गिफ्टसह तिच्या त्वचेला हाताने निवडलेल्या इंग्लिश रोझेजचा चांगुलपणा मिळू द्या. ६० मिली शॉवर जेल, ५० मिली बॉडी बटर आणि ३० मिली हँड क्रीम असलेले हे मिनी गिफ्ट सतत प्रवास करणाऱ्या मातांसाठी अनुकूल आहे.

लॅथर अॅण्ड स्लॅथर ब्रिटीश रोझ गिफ्ट केस:

आईला सकाळी उठल्यापासून दिवसभर अनेक कामे करावी लागतात, ज्यामुळे पॅम्परिंग सत्र अत्यावश्यक आहे, जे द बॉडी शॉपचे लॅथर अॅण्ड स्लॅथर ब्रिटीश रोझ गिफ्ट केस देईल. पुनर्वापर होण्याजोग्या गिफ्ट केसमध्ये ६० मिली शॉवर जेल, ५० मिली बॉडी बटर आणि ३० मिली हँड क्रीम असलेला हा सेट परिपूर्ण मदर्स डे गिफ्ट आहे. हा सेट तुमच्या आईला काही ‘मी टाइम’चा आनंद घेण्यास आणि स्वत:ची काळजी घेण्यास साह्य करेल.

जॉली अॅण्ड ज्यूसी स्ट्रॉबेरी एसेन्शियल्स गिफ्ट:

स्ट्रॉबेरीचा आल्हाददायी फळांचा सुगंध तुमच्या त्वचेला टवटवीत करेल. द बॉडी शॉपचे जॉली अॅण्ड ज्यूसी स्ट्रॉबेरी एसेन्शियल्स तुमच्या आईला घरामध्येच लक्झरीअस सेल्फ केअर सत्राचा आनंद देईल. २५० मिली शॉवर जेल, २०० मिली बॉडी योगर्ट, ३० मिली हँड क्रीम व मिनी रॅमी बाथ लिली असलेले हे गिफ्ट सेट फळांचा उत्साहवर्धक सुगंध देईल.

हॅप्पी अॅण्ड हायड्रेटेड व्हिटॅमिन ई स्किनकेअर गिफ्ट:

द बॉडी शॉपचा हॅप्पी अॅण्ड हायड्रेटेड व्हिटॅमिन ई स्किनकेअर गिफ्ट सेट त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचा कोमल करण्यासाठी अनुकूल आहे. या गिफ्ट सेटमध्ये सौम्य क्लीन्सिंग फेश वॉश, मॉइश्चरायझिंग क्रीम व कूलिंग जेल मिस्ट आहे, हे सर्व घटक उत्तम हायड्रेशन देतात. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी परिपूर्ण असलेल्या या गिफ्ट सेटमधील उत्पादने रिसायक्लेबल कंटेनर्समध्ये येतात.

रिच अॅण्ड क्रीमी अॅवोकॅडो एसेन्शियल्स गिफ्ट:

द बॉडी शॉपच्या रिच अॅण्ड क्रीमी अॅवोकॅडो एसेन्शियल्स गिफ्ट किटसह कोमल, तेजस्वी त्वचा मिळवा. या किटमध्ये २५० मिली शॉवर क्रीम, २०० मिली बॉडी योगर्ट, ३० मिली हँड क्रीम व मिनी रॅमी बाथ लिली आहे. अॅवोकॅडो आणि स्पेनमधील कम्युनिटी फेअर ट्रेड ऑर्गनिंग आल्मंड मिल्क असलेल्या या गिफ्ट सेटमधील उत्पादने निश्चितच तुमच्या आईच्या त्वचेला कोमल, तेजस्वी करण्यासोबत आवश्यक पोषण देतील.

प्रोटेक्ट अॅण्ड सॉफ्टन हँड बाम ट्रिओ:

आपल्या आईच्या हातांना दररोज खूप काम करावे लागते, म्हणून द बॉडी शॉपच्या प्रोटेक्ट अॅण्ड सॉफ्टन हँड बाम ट्रिओसह त्‍यांना लक्झरीअस हँड केअर सत्राचा आनंद द्या. शिया बटर, आल्मंड मिल्क व अॅवोकॅडो असलेले हँड बाम्स अल्ट्रा-हायड्रेटिंग आहेत आणि हातांची काळजी घेण्यासोबत मॉइश्चरायझिंगची खात्री देतात.


Back to top button
Don`t copy text!