
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंद कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत 40 ते 45 वयोगटातील अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत आढळला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशन मिळालेली अधिक माहिती अशी की कराड वाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास वनविभाग हद्दीत स्त्री जातीचा अंदाजे 40 ते 45 वयोगटातील अनोळखी मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या अंगावर तांबड्या रंगाची साडी असून ही घटना अंदाजे आठ दिवसापूर्वी घडल्याची शक्यता आहे. घटनास्थळी लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी पाहणी करून यावेळी पोलीस कर्मचारी महेश सपकाळ विठ्ठल काळे विष्णू धुमाळ अमोल पवार फैयाज शेख शिवशंकर तोटेवाड बी डी प्रिया नरोटे मेघा ननावरे यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे या मृतदेह बाबत कोणास काही माहीत असल्यास लोणंद पोलीस स्टेशन ची संपर्क साधावा



