बेपत्ता ट्रक चालकाचा मृतदेह ऊरूल घाटाच्या दरीत आढळला


स्थैर्य, सातारा, दि.२: बेपत्ता ट्रक चालकाचा मृतदेह ऊरूल घाटाच्या दरीत  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  संतोष गोडसे यांची हत्या कि  आत्महत्या शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर उभे  राहिले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी  रोजी पोलीसांना ऊरूल घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती  मिळाली. याबाबत पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बेपत्ता असलेल्या  गोडसे यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले.  नातेवाईकांनी ते गोडसे असल्याचे खात्रीने सांगितल्याने आता  नेमकी ही हत्या कि  आत्महत्या याबाबत तपासकार्य सुरू करण्यात आले आहे. मानसिक स्थीती बरी  नसलेल्या बाबांच्या मृत्यूंची माहिती मिळताच गोडसे कुंटूबीयांवर दु:खाचा डोगर क ोसळला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखुन सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस  निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे  व टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊ न तपासचके्र वेगाने फिरवली.याबाबत अधीक माहिती अशी कि,  सातारा जिल्ह्यातील उब्रंज पाटण मार्गावरील ऊ रूल घाटातून संतोष  नंदकुमार गोडसे  (वय  वर्षे  44) रा. संगम माहुली  हे ट्रक  चालक बेपत्ता झाल्याची फिर्याद मल्हार पेठ पोलीस ठाण्यात अनिल लोखंडे ट्रक  मालक यांनी  दाखल केली होती. फिर्यादीत सांगितले होते कि, संतोष गोडसे हे ऊ  रूल घाटातून पाटण येथून वीटा भरलेला ट्रक घेऊन जात असताना पाटणकडून  येणार्‍या चारचाकी वाहन ट्रकला घासल्याने ट्रक थांबवला. चारचाकी गाडीचालकाने  याबाबत कोणतीही तक्रार नसल्याने ते निघून गेले, दरम्यान, गोडसे यांनी मुजावर या  त्यांच्या सहकार्याला लघवीला खाली उतरतो सांगत त्याकडे पैशाचे पाकिट व  मोबाईल देऊन उब्रंजच्या दिशेने गेले. ते पुन्हा आलेच नसल्याचे फिर्यादीत सांगितले  आहे.

याबाबत मुजावर यांने ट्रक मालक लोखंडे यांना फोन करून हकीकत सांगितली.  याबाबत नंतर गोंडसेंची नातेवाईकांसह सर्वांनी शोधाशोध केली, घरी येईल म्हणून  त्यांची वाट देखील पाहीली व दुसर्‍या दिवशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.   गोडसे यांची मानसिक अवस्था बरी नसल्याने त्यांना गोळ्या सुरू असल्याचे  पोलीसांना नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांच्या गोळ्या चुकल्यानंतर त्यांची  प्रकृती अधिकच अत्यावस्थ होईल, अशी भिती नातेवाईकांना वाटत होती.  अपघाताची  घटना  घडल्यानंतर भीतीपोटी घटनास्थळावरून निघून गेल्याचे  नातेवाईकांचे म्हणणे होते. मृतदेह आढळून आल्याने नेमकी त्यांची हत्या की  आत्महत्या हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!