राजुरीत भिषण अपघात; ऊस वाहतुक ट्रॅक्टर व इंडिका कारच्या धडकेत दोन जण ठार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि.२:  फलटण – पंढरपूर या पालखी मार्गावर राजुरी (ता.फलटण) येथील सुरभी हॉटेल व साधुबुवा मंगल कार्यालयाच्या समोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व इंडिकाकारमध्ये झालेल्या भिषण अपघातात 2 जण ठार झाले आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बरड पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. 31 जानेवारी रोजी रात्री 9 च्या दरम्यान ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.- 42 – ए.एफ. – 6518 हा ऊस घेऊन फलटण येथील स्वराज साखर कारखान्याकडे निघाला होता. तर फलटण कडून नातेपुतेच्या दिशेने चाललेली इंडिका कार क्रमांक एम.एच.- 42 – ए. – 2482 या गाडीतील चालक यांनी चुकीच्या दिशेने जाऊन राजुरी येथील सुरभी हॉटेल समोर ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोहन महिपती कदम (वय 55) राहणार कुरवली (ता. इंदापूर) व चालक जितेंद्र उत्तम रणवरे(वय 45) राहणार सणसर (ता. इंदापूर) दोघे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबतची तक्रार कदम यांचे मेव्हणे तेजस विष्णू यादव (रा. राजुरी, ता. फलटण) यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!