स्थैर्य,नवी दिल्ली, दि २२: देशात सध्या पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने राज्यात तेलाच्या किमतीत 1 रुपयांनी घट करण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेलाच्या करात घट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रात लिहले आहे की, सध्या तेलाच्या किमतीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. मला समजत नाही की, कोणतेही सरकार अशा विचारशून्य आणि अंसवेदनशील निर्णयाला खरे कसे ठरवू शकते. या निर्णयामुळे देशातील जनतेवर ओझे वाढत आहे.
वाढलेल्या किमती कमी कराव्यात – सोनिया
सोनिया यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी तुम्हाला निवदेन करते की, तेलाच्या वाढीव किमती लवकरात लवकर कमी करुन देशातील मध्यमवर्ग, नोकरदारवर्ग, शेतकरी आणि गरिबांसोबत देशातील सामान्य लोकांना दिलासा द्यावा.”
एक्साईज ड्यूटीवर प्रश्न उपस्थित
सोनिया यांनी पुढे लिहले आहे की, गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारने डीझेलवर 820% आणि पेट्रोलवर 258% एक्साईज ड्यूटी वाढवली आहे. याद्वारे सरकारने जनतेकडून 21 लाख कोटी रुपये कमावले असून हा संपूर्ण पैसा त्या लोकांजवळ गेला पाहिजे, ज्यासाठी सरकारने जमा केला आहे.
देशातील मध्यमवर्ग कठीण परिस्थितीत – सोनिया गांधी
पत्रात म्हटल्यानुसार, देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या नष्ट झाल्या असून लोकांच्या उत्पादनात देखील घट झाली आहे. देशातील मध्यमवर्ग सध्या कठीण परिस्थितीशी सामना करतोय. देशात महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, या सर्व परिस्थितीत सरकार लोकांना दिलासा देण्याऐवजी फायदा उचलत आहे.
असाममध्ये 5 रुपायांची घट केली होती
यापूर्वी भाजपप्रणीत असाम सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीत 5 रुपायांनी घट केली होती. राज्याच्या अर्थमंत्री हेमंता विश्वासर्मा यांनी 12 फेब्रुवारी रोजी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली होती.
52 दिवसांत 24 वेळा वाढल्या किमती
पेट्रोल-डीझेलच्या किमतीत या वर्षी 21 फेब्रुवारीपर्यंत 14 वेळा वाढ झाली आहे. दरम्यान, दिल्लीत पेट्रोलमध्ये 4.03 रुपये तर डीझेलमध्ये 4.24 रुपायांनी वाढ झाली होती. यापूर्वी जानेवारीमध्ये किमती 10 वेळा वाढल्या असून पेट्रोलच्या किमतीत 2.59 आणि डीझेलमध्ये 2.61 रुपयांनी वाढ झाली होती. दुसरीकडे, यावर्षी जर बघितले पेट्रोलमध्ये 6.77 रुपये तर डीझेलमध्ये 7.10 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे.
पेट्रोल-डीझेल वाढण्याचे तीन कारणे
कच्चा तेलाच्या किमती गगनाला भिडल्या असून, यात आतापर्यँत 23% वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव 51 डॉलर प्रति बॅरल होता. परंतु, आता हाच भाव 63 डॉलर झाला आहे. याचे कारण जगातील आर्थिक परिस्थितीत सकारात्मक परिणाम दिसत असल्यामुळे तेलाची मागणी वाढत आहे. देशातील केंद्र सरकार पेट्रोल-डीझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करत नाही. दिल्लीचे उदाहरण घ्यायचा झाल्यास, केंद्राकडून पेट्रोलवर 32.90 रूपये तर डीझेलवर 31.80 रूपये एक्साईज ड्यूटी लावली जाते. राज्य सरकारकडून पेट्रोल-डीझेलवर कर लावले जात असून, दिल्लीत पेट्रोलवर प्रति लिटर 20.61 कर लावण्यात आला आहे.