राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे पार पडली.

बैठकीला केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत केंद्राच्या वार्षिक लेख्यांना तसेच खर्चाला मान्यता देण्यात आली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी केंद्राच्या अधिपत्याखालील राज्यांमध्ये सांस्कृतिक कार्याला चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!