दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । तरडगाव येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय,फलटण यांच्या वतीने फलटण तालुक्यातील तरडगाव या गावात कृषिदूतांनी कृषी व उद्यानविद्या संबंधित मोबाईल ॲप्ससंबधी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यामध्ये कृषिदूतांनी Plantix, Palntifier, Fertilizer Calculator, Vegetable garden planner, Mandi Market यांसारख्या अँप्सची माहिती शेतकऱ्यांना दिली. हे अँप्स कसे वापरावे यासाठी मार्गदर्शन केले आणि अँप्स वापरतांना शेतकऱ्यांना काही समस्या आल्या त्याचे कृषिदूतांनी निवारण केले. हे मोबाईल अँप्स कृषी उत्पादन वाढवू शकतात. शेतकऱ्यांना सहज रित्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकते. हे अँप्स फळे, फुले आणि भाजीपाला इत्यादी संबधी उपयुक्त माहिती पुरवतात यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, विषय शिक्षक प्रा. संजय अडत, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत गणेश पवार, ओंकार रांधवन, पंकज सरक, महेश शिंदे, मानस शिंदे, अजिंक्य सूळ, शुभम वायसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.