
दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । महात्मा डुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण कृषी विद्यालयाच्या कृषिदुतांनी फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतकऱ्याच्या समवेत कृषी कार्यानुभव उपक्रमात फळबाग लागवड चौरस मांडणी पद्धत या विषयाचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. यावेळी हिंगणगावासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे, प्रा.एन.ए. पंडित, प्रा.एस.वाय. लाळगे व विषय मार्गदर्शक प्रा. एस. एस. अडत यांचे कृषीदूत विश्वजीत गिरीगोसावी, मंगेश चव्हाण, मयुरेश भोसले, संकेत दवणे, दीपक मरकड, अभिषेक टेकळे, ऋषिकेश चव्हाण यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.