वाहन चालकांना त्रासदायक ठरणारी लोखंडी जाळी अखेर काढली पालिका पाणीपुरवठा विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि २१: गेल्या कित्येक दिवसांपासून साताऱ्यातील वरच्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळा ठरणारी व्हॉल्ववर बसवलेली लोखंडी जाळी नगरपालिका प्रशासनाने हटवली आहे. त्याखालील जलवाहिनीच्या व्हॉल्वची दुरुस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा जाळी न बसविता तेथे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत

सातारा येथे वरच्या रस्त्यावर मेळवणे जलकुंभाच्या जवळ पाण्याच्या व्हॉल्ववर बसवलेली लोखंडी जाळी वाहनचालकांना नेहमीच त्रासदायक ठरली होती. या ठिकाणी जाळीमध्ये दुचाकी अडकून अनेकदा किरकोळ अपघात झाले होते. त्यामुळे बहुतांश वाहन चालक जाळी चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या विरुद्ध बाजून जात होते. त्यामुळेही गेल्या काही वर्षात छोटे मोठे अपघात झाले आहेत.

दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी व्हॉल्व दुरुस्तीच्या निमित्ताने अवजड लोखंडी जाळी जेसीबी लावून काढण्यात आली. त्याठिकाणी सध्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जाळी न बसवता तेथे पुन्हा खडी सिमेंटने काँक्रीटीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.अनेक दिवसांपासून लोकांना त्रासदायक ठरणारी जाळी काढल्याने वाहन चालकामधून समाधान होत आहे.


Back to top button
Don`t copy text!