प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अद्याप मोकाट

४५ दिवसांपासून फलटण ग्रामीण पोलिसांना आरोपींचा थांगपत्ताच नाही!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरी (ता. फलटण) गावच्या राजुरी चौफुला परिसरात युवा उद्योजक विनोद सांगळे यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने पाचजणांनी प्राणघातक हल्ला केला होता. ४५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट आहेत. खुलेआमपणे परिसरात वावरत आहेत, अशी माहिती आहे. धमकावणे, खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण हत्याराने मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न आदींसह आरोपींवर एकूण यापूर्वीही ३२६, ३५४ यासारखे गुन्हे दाखल आहेत, असे समजते. आरोपींनी सांगळे यांच्या डोक्यावर, हातावर लोखंडी रॉडने, तलवारीने मारहाण करून डोके व हात फ्रॅक्चर केले होते.

फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण १४ कलमान्वये हा गुन्हा दाखल आहे. विनोद सांगळे यांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी फलटण ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली होती.

याप्रकरणी जिल्हा न्यायलयाने व मुंबई हायकोर्टाने सदर आरोपींना जामीन फेटाळला असून याचा तपास वरीष्ठ अधिकार्‍यांकडे असून सुद्धा पोलिसांच्या प्रेमापोटी गंभीर गुन्हातील आरोपी मोकाट आहेत, अशी चर्चा आहे. यामुळे फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


Back to top button
Don`t copy text!