
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । कराड । मलकापूर, ता. कराड येथून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील मदरसा परिसरात असणाऱ्या राहत्या घरातून जिया आयुब मणेर हे घरात कोणास काही एक न सांगता निघून गेल्याची तक्रार तौहीद राजू मणेर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.