दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । फलटण । ठाकुरकी व फरांदवडी गावांमधील वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे लोकवस्तीत होणारी वाढ व त्यासाठी करावयाचे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते याबाबत आमचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून ठाकूरकी व फरांदवाडी या गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे यांनी दिली.
आमचे नेते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गावातील पाण्याची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी आग्रह धरून मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातुन जल जीवन मिशन अंतर्गत ठाकुरकी व फरांदवाडी संयुक्त नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेसाठी शासनाच्या वतीने 19 कोटी 57 लाख 76 हजार रुपये इतक्या रकमेची कामाची मंजुरी मिळालेली आहे, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याबाबत आमदार दीपक चव्हाण यांनी ठाकुरकी व फरांदवाडीच्या ग्रामस्थांना प्रत्यक्षात मंजुरी पत्र सोशल मीडियावर दिली.
सदरील योजना मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असून लवकरच विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा भव्य समारंभ घेण्यात येणार आहे, अशी फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे यांनी दिली.