फलटण परिसरातील दहा कामगारांचा श्रीमंत रामराजेंच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२३ | फलटण |
फलटण शहर व परिसरात पन्नास ते साठ वर्षे अखंडित कष्ट करणार्‍या दहा कामगारांचा सत्कार विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रसाद जोशी हॉस्पिटल सभागृहात काल दुपारी पार पडला.

या सत्कार सोहळ्यात मान्यवरांबरोबरच या साध्यासुध्या माणसांना दीप प्रज्ज्वलित करताना पाहणे, हा एक वेगळाच आनंद सोहळा होता. या साध्यासुध्या माणसांनी आपल्या जुन्या आठवणी सांगताना फलटणचा इतिहासच सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उभा केला. श्रीमती उषा कुलकर्णी यांनी श्रीमंत रामराजे यांच्या आजीची सुश्रुषा केली, हे ऐकताना व्यासपीठासह सभागृहालाही भरून आलं.

यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले की, इतकी वर्षे ही माणसं आपापल्या ठिकाणी आपापल्या कामात इतकी व्यस्त आहेत की, त्यांना माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही. कारण बदली, प्रमोशन अशा कुठल्याच गोष्टींचा यांना त्रास नाही. तरीही हे लोक नसते तर आपल्या समाजाचा गाडा कसा चालला असता, असा प्रश्न पडतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात यांच्या कष्टाचा फार मोलाचा वाटा आहे.

श्रीमंत रामराजे पुढे बोलले की, ही माणसे इतकी समाधानी आहेत जी आमच्याकडे असूनही आम्ही तितके समाधानी नाही. म्हणून परमेश्वराने माझ्या आयुष्यातली काही वर्षे कमी करावी आणि या सर्व लोकांना दीर्घायुषी करावे.

श्रीमंत रामराजेंची ही वाक्ये सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून गेली. तिथे आदरवत प्रजा पाहायला मिळाली आणि पितृतुल्य राजाही पाहायला मिळाला.


Back to top button
Don`t copy text!