किशोरवयीन मुलांचा नव्या युगातील डिजिटल वित्तीय उपाय शिकण्याकडे कल : मॉम्सप्रेसो

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । नव्या युगातील डिजिटल वित्तीय उपाय शिकण्याकडे भारतीय किशोरवयीन मुला-मुलींचा चांगलाच कल असल्याचे दिसून आले आहे. आपली आर्थिक साक्षरता वाढवण्याबाबत ते उत्सुक आहेत. भारतातील किशोरवयीन केंद्रीत पॉकेट मनी अॅप मुविन आणि मॉम्सप्रेसो.कॉमने एकत्रितपणे केलेल्या ग्राहक सर्वेक्षणात या बाबी समोर आल्या आहेत. हा आपल्या प्रकारचा पहिलाच किशोरवयीन केंद्रीत आर्थिक साक्षरता सर्व्हे आहे. यातून बऱ्याच रोचक मुद्द्यांचा उलगडा झाला आहे. भारतात पॉकेट मनी अॅप्सचा वापर वाढण्याशी त्याचा थेट संबंध आहे. पेमेंट्समध्ये वेगाने डिजिटायजेशन होत असताना किशोरवयीनांची आर्थिक मुद्द्यांवर किती समज आहे हेही जाणून घेण्याचा उद्देश या सर्वेक्षणाचा होता.

या ग्राहक सर्वेक्षणात इयत्ता ७ वी ते इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या ६०० किशोरवयीन आणि त्यांच्या पालकांच्या (६००) प्रतिसादांचे विश्लेषण करण्यात आले. भारतभरात झालेल्या या सर्व्हेत दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासारख्या अग्रगण्य शहरांचा समावेश करण्यात आला.

सर्वेक्षणात सहभागी बहुसंख्य पालकांना (९६%) वाटले की त्यांच्या मुलांना आर्थिक व्यवस्थापन साधनांविषयी पुरेसे ज्ञान नाही. वित्तीय शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक विश्वासार्ह स्रोत असण्याची गरज त्यांना वाटते. याची पुष्टी करणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ९३% किशोरवयीन प्रतिसादकर्त्यांनी डिजिटल पेमेंट्सबाबत शिकण्याबाबत स्वारस्य दाखवले. त्यांच्यापैकी केवळ २२% मुलांना डिजिटल पेमेंट्स करण्याबाबत आत्मविश्वास वाटतो. आधुनिक डिजिटल पेमेंट साधनांचा वापर शिकण्याबाबत बहुसंख्य मुलांची तयारी असली तरी ८०% भारतीय विद्यार्थी रोजच्या खर्चासाठी प्राथमिक पर्याय रोख रकमेचाच वापरत आहेत.

सर्व्हेत सहभागी झालेल्या ९४% पालकांना वाटते की, त्यांची मुलांना डिजिटल वॉलेट्सविषयी शिकण्यात रस आहे. यातून अधिक सुसंघटित आणि विश्वसनीय वित्तीय सल्ला मसलत यंत्रणेची गरज आणखीच अधोरेखित होते. दुसरीकडे, किशोरवयीन मुले एक पाऊल पुढे आहेत. ७०% मुलांना ब्लॉकचेन आणि एनएफटीसारख्या क्रिप्टो अॅसेट्सबद्दल शिकण्याची इच्छा आहे.

मॉम्सप्रेसो डॉटकॉमचे सह-संस्थापक तथा सीओओ प्रशांत सिन्हा म्हणाले की, “भारतातील युवांमध्ये आर्थिक साक्षरतेची निकड वाढत चालली आहे. या आर्थिक साक्षरता सर्वेक्षणातून ही गरज अधिक अधोरेखित झाली आहे. मुविनसोबत भागीदारीचा आम्हाला अत्यानंद आहे .किशोरवयीन मुलांना उत्तम आर्थिक निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून जागरुकता वाढवणे आणि भारतातील आपल्या प्रकारची पहिलीच स्पर्धा – आगामी मनी ऑलिम्पियाडच्या माध्यमातून आम्ही सरसावलो आहोत.”

मुविनचे सहसंस्थापक मुकुंद राव म्हणाले की “भारतीय किशोरवयीन आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आर्थिक स्वावलंबी बनत आहेत. युवा ग्राहक म्हणून जेव्हा ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बाब किंवा ज्या गोष्टींची निवड करत असतात तेव्हा ते स्वत:चे मत बाळगून असतात. मग त्या निवडी गॅजेट्स, फॅशन, खाद्यपदार्थांची संबंधित असो की प्रवासाशी निगडित. भारतातील २५० दशलक्ष युवा आणि किशोरवयीनांचे डिजिटल आर्थिक सर्वसमावेशकता आणि वित्त साक्षरतेबाबत सक्षमीकरण करण्याचे आमचे स्वप्न आहे. सध्याच्या आमच्या पॉकेट मनी अॅप, प्रीपेड कार्ड आणि रूपे की-चेनसह सर्व सेवा पूर्णपणे स्वयं-सहाय्यित आणि स्वयं-व्यवस्थापित आहेत. यातून आम्ही भारतातील किशोरवयीन ग्राहकांना सुलभ आणि सुरक्षितपणे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी सक्षम करत आहोत.”


Back to top button
Don`t copy text!