दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता एकदिवशीय ‘लघुपट ,चित्रपट,नाट्यसंहिता लेखन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आलेली आहे .या कार्यशाळेचे उद्घाटन म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे हे करणार असून कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हे उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा.(डॉ) प्रकाश दुकळे यांची या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर एकदिवसीय कार्यशाळा दोन सत्रात संपन्न होणार आहे .प्रथम सत्रामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मा. शिवाजी करडे ,पुणे हे लघुपट व नाट्यसंहिता लेखन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर द्वितीय सत्रामध्ये मा. मीतेश टाके ,श्रीरामपूर हे चित्रपट व लघुपट संहिता लेखन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयाच्या मराठी विभागातील विद्यार्थी व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाशी सामंजस्य करार केलेल्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक देखील उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील साहित्याची जाण असणारे मराठी विषयाची विद्यार्थी तसेच प्राध्यापक त्याचबरोबर कला विज्ञान व वाणिज्य इत्यादी विद्याशाखांमधील चित्रपट क्षेत्राशी जिज्ञासा असणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा व ५ सप्टेबर पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन मराठी विभाग प्रमुख व सदर कार्यशाळेचे संयोजक प्रा.(डॉ)सुभाष वाघमारे आणि कार्यशाळा समन्वयक डॉ. कांचन नलावडे यांनी केले आहे.