दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान फलटण यांच्यातर्फे श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब जयंती-पुण्यतिथीनिमित्त तालुकास्तरीय भजन स्पर्धा शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर २०२३ पुरूष संघाची व शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी महिला संघाची आयोजित केली आहे.
ही स्पर्धा ज्ञानेश्वर मंदिर, लक्ष्मीनगर, फलटण येथे होणार असून स्पर्धेची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ११,१११/-, द्वितीय क्रमांकास ७,७७७/- व तृतीय क्रमांकास ५,५५५/- असे बक्षीस विजयी पुरूष व महिला संघांना स्वतंत्र रोख व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क २०० रूपये असून १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत संघांनी आपली नावनोंदणी करायची आहे. नावनोंदणी श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान कार्यालय, श्रीराम मंदिर, फलटण येथे श्री. नामदेव भांडवलकर – ९८२२६४६२३६ यांच्याकडे किंवा फलटण एज्युकेशन सोसायटी ऑफीस, फलटण येथे करावयाची आहे.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे :
१. स्पर्धक संख्या जास्तीत जास्त १० असावी.
२. सादरीकरणाची वेळ १० मिनिटे असेल.
३. स्पर्धेतील अभंग आणि गौळणी संत रचनेवर आधारीत असाव्यात. चित्रपटातील चालींचे स्पर्धेत गुणांकन केले जाणार नाही.
४. प्रत्येक संघाने एक अभंग व एक गौळण सादर करावयाची आहे.
५. या स्पर्धेमध्ये स्वतंत्र पुरूष, स्वतंत्र महिला अशा संघांना सहभाग घेता येईल.
६. पुरूष संघात फत पुरूष व महिला संघात फत महिलांनाच सहभाग घेता येईल.
७. सर्व सहभागी संघांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
९. पुरूष संघात महिला वादक व महिला संघात पुरूष वादक सहभाग घेऊ शकतात. (एखाद्या संघाकडे वादक उपलब्ध नसल्यास त्याची पूर्वकल्पना द्यावी.)
१०. स्पर्धेत केले जाणारे गुणदान अभंगाची निवड, सादरीकरण, सूर-ताल व एकूण प्रभाव यावरून केले जाईल.
११. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१२. स्पर्धेत काही बदल करायचे असतील तर त्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील.