पिंप्रद हद्दीतील कॅनॉलवर पाण्याची चोरी; कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
पिंप्रद (ता. फलटण) हद्दीतील २६ फाटा दरफाजवळील कॅनॉलवर पाण्याची चोरी होत असून या चोरीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजाळे येथील निखिल निंबाळकर यांनी नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

निंबाळकर यांनी केलेल्या अर्जात म्हटले आहे की, पिंप्रद हद्दीतील गट क्रमांक ८२७ मध्ये २६ फाट्याच्या दरफाजवळ २४ गुंठे क्षेत्रात अजित भैरू पाटील व हणमंत बाबुराव काकडे यांनी तळे करून गेली २० वर्षे कॅनॉलमधून चार इंची दोन सायपन कॅनॉलमध्ये पाईप पुरून सरळ तळ्यात सोडून तसेच २६ फाट्याच्या दराफाजवळ एक लोखंडी दराफ बसवून सिमेंट पाईपमधून अंदाजे आठ ते दहा इंच पाईपच्या माध्यमातून पाणी चोरून २० वर्षे शासनाचा कर बुडवून तळे भरत आहेत. हे पाणी माजी सनदी अधिकार्‍याच्या व इतरांच्या नावावर असलेल्या बेनामी जमिनी भिजवण्यासाठी वापरत आहेत. या पाण्यावर शंभर एकरावर तळ्यातून चार ते पाच मोटार सुरू असून कुठेही सातबार्‍यावर तळ्याची नोंद नाही.

शासनाचे कोट्यवधी रूपयांचे पाणी चोरून वापरल्यामुळे संबंधित तळ्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून त्यावर कायदेशीर कारवाई करावी व आर्थिक नुकसान भरून काढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी आपल्या कार्यालयापुढे उपोषण करणार आहे. यासंबंधी माझ्याकडे सर्व स्थळाचे पुरावे आहेत, असे निंबाळकर यांनी अर्जात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!