फलटण विधानसभा भाजपाकडे घ्या!; जयकुमार शिंदे यांची पक्ष निरीक्षकांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२४ | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तब्ब्ल १८ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. यासोबतच फलटण तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रश्न हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये मार्गी लावले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला मिळावा. फलटण तालुक्यातील जनतेला आता परिवर्तन हवे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून जावू शकतो; त्यामुळे हा मतदारसंघ हा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळावा; अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख यांच्यासोबत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक धनंजय जाधव यांची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत जयकुमार शिंदे बोलत होते.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिलेल्या साथीमुळे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गत २५ वर्षात रखडलेला विकास मार्गी लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने निरा देवधरचे पाणी, फलटण – बारामती रेल्वे, धोम – बलकवडी कॅनॉल बारमाही करणे, नाईकबोमवाडी MIDC, रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधीसह अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. या सर्व बाबींमुळे जनता हि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही यावेळी जयकुमार शिंदे यांनी दिली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून या तालुक्यातील जनतेचे नुकसान काही पुढार्यांनी केले आहे. त्यांना आता ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. फलटण तालुक्याचा भूमिपुत्र हा केंद्रात मंत्री झाला असता व तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला केला असता. यावेळी कसल्याही परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचा आमदार बदलायचा आहे; असं जनतेने ठरवलेल आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात पक्षाला लीड मिळाले तेथे भाजपाला उमेदवारी घ्यावी अशी एकमुखी मागणी केली असल्याची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली.

यावेळी विधानसभा प्रमुख सचिन कांबळे – पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!