मधकेंद्र योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी


दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून  शेतकऱ्यांनी  व बेरोजागारांना रोजगाराची नवी संधी आली असून त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केली आहे.

मधमाशापालन उद्योग करण्यास इच्छुक पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना मधमाशापालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मधमाशा पालन उद्योग करण्यासाठी लागणारे मधपेट्या, मधयंत्र व इतर साहित्य खरेदीसाठी लागणारी एकूण रक्कमेच्या 50 टक्के अनुदान व 50 टक्के रक्कम व स्वगुंतवणूक लाभार्थ्यांची असेल. मधपाळांकडून उत्पादित होणारे मध मंडळाकडून हमीभावाने खरेदी करण्यात येईल.

वैयक्तिक मधपाळासाठी पात्रता –अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त.  तसेच 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

प्रगतशील मधपाळ (केंद्र चालक) पात्रता किमान 10 वी पास वय 21 वर्षापेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नांवे किंवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेतीजमीन किंवा भाडेतत्वावर  घेतलेली शेती जमीन लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत  लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

लाभार्थ्यांची  प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी मधपेट्या व इतर साहित्याची 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम प्रशिक्षणापूर्वी भरणे आवश्यक आहे.

अधिक  माहितीसाठी  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, रहिमतपूर रोड, देगांव फाटा, कोडोली, सातारा.  भ्रमणध्वनी   क्र.9545377268 येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी  कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!