स्थैर्य, फलटण दि.१८: सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तडीपार असलेल्या युवकास फलटण शहर पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजी वाचनालय जवळ, शंकर मार्केट परिसरात राहणारा अक्षय बाळकृष्ण माने, वय 24 याला सातारा पोलीस अधिक्षकांच्या आदेश क्रमांक स्थानिक गुन्हे शाखा 4/19 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55/2000/2019 हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक कार्यालय सातारा दिनांक 20/9/2019 या आदेशान्वये सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. परंतू हा आदेश मोडून सदर आरोपी दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास श्रीराम मंदिराजवळील गेस्ट हाऊस जवळ वावरताना आढळून आल्याने त्याला फलटण शहर पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबतची फियाद पोलीस नाईक नितीन प्रल्हाद भोसले यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ठाकूर करीत आहेत.