तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला अटक; सातारा शहर पोलिसांची कामगिरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । सातारा । सदर बझार परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विपुल तानाजी नलवडे वय 20 करंजे याला सातारा शहरांमधून तडीपार करण्यात आले होते.

दि. 25 जून रोजी नलवडे त्याचा मित्र सतीश पवार यांच्यासह सदर बाजार येथे लोकांना घरगुती कारणासाठी दमबाजी करण्यासाठी आला होता. सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये तलवार घेऊन त्याने लोकवस्तीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो त्याच्या मित्रासह माघारी पळून गेला.

या प्रकरणाची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली असता त्यांनी या पथकाला तत्काळ पाचारण केले. या पथकाने नलवडे याला शस्त्रांसह तात्काळ अटक केली. यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात सात गुन्हे सातारा तालुका पोलीस ठाण्यात एक आणि सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!