बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत मधुर भोसलेला कांस्य पदक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । सातारा । बुलढाणा येथे झालेल्या 90 व्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या मधुर दौलत भोसले याने ९२ प्लस वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून कांस्यपदक पटकावले. तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे स्टार टू पंचाधिकारी संजय पवार यांनी स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बजावली. याबद्दल दोघांचाही सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सत्कार करून अभिनंदन केले

यावेळी युवा करिअर अकॅडमीचे अध्यक्ष विश्वास मोरे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते. मधुर भोसले याला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, प्रशिक्षक विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल भोसले आणि पवार यांचे सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, विभागीय सचिव योगेश मुंदडा, जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, सचिव रवींद्र होले, अमर मोकाशी, विजय मोहिते, बापूसाहेब पोतेकर ,सुनीलकुमार रासकर, गजानन फरांदे, गणेश माने, शैलेंद्र भोईटे व सर्व पदाधिकारी,पालक, खेळाडु यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!