
स्थैर्य, सातारा, दि.28 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.