स्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । मुंबई । स्वामी विवेकानंद यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या कार्याने भारताला नवी ओळख प्राप्त करून दिली. भारताला पुन्हा स्वर्णिम युगात नेण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारत विकास परिषद, महाराष्ट्र, मुंबई प्रांत यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंती निमित्त आयोजित नाट्य मंचन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमरावसिंह ओस्तवाल, उपाध्यक्ष संपत खुरदिया, विद्याधर मोरवाल, महासचिव दिलीप माहेश्वरी, अनिल गग्गड, मार्गर्शक वीरेंद्र याज्ञिक आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राजीव श्रीवास्तव, मुंबई मेट्रोचे विभागीय संचालक शंतनू चॅटर्जी, सुनील कर्वे, अनुप श्रीवास्तव, भावेश चंदुलाल शहा, आशुतोष राठोड, अनुप बलराज, डॉ. अमूल्य साहू, डॉ. दिलीप रामदास पवार, अनुप शेट्टी आदींचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूरच्या राधिका क्रिएशनच्या सारिका पेंडसे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य मंचन सादर केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी जगाला जिंकले. त्यांचे अमेरिकेतील भाषण दिग्विजयी होते. या भाषणाने जगाला नवा विचार दिला. भारतीय संस्कृतीबरोबरील विविध संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र, भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची स्वामी विवेकानंद यांनी जगाला ओळख करून दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एमईटीचे व्हाइस चेअमन सुनील कर्वे, परिषदेचे उपाध्यक्ष श्री. खुरदिया, डॉ. अनुप श्रीवास्तव आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. माहेश्वरी, श्री. याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!