
दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
सालपे, ता. फलटण येथील ग्रामदैवत भैरवनाथ जयंती उत्सवानिमित्त ग्रामस्थांचे सहकार्य व सक्रिय सहभागाने भैरवनाथ जयंती उत्सव व संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञानप्रबोधनासाठी राष्ट्रपती पारितोषिक विजेते, प्रख्यात निसर्गोपचार तज्ज्ञ व आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक स्वागत तोडकर यांचे ‘हसत खेळत घरगुती उपचार’ या विषयावर रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सालपे येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सालपे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आरोग्यविषयक समस्यांचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्याख्यानास अवश्य उपस्थित रहावे. आपल्या घरातील, मनातील आरोग्याबद्दलचे प्रश्न व त्याचे उत्तरे व्याख्यानातून मिळतील, असे आवाहन करण्यात आले आहे.