‘सुझुकी मोटारसायकल इंडिया’चा उच्चांक; ८० लाख ग्राहकांची नोंद

विक्री व विक्री पश्चात सेवेचा उत्सव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | सातारा |
जागतिक दुचाकी बाजारपेठेतील आघाडीची उत्पादक जपानची ‘सुझुकी मोटर कॉर्पोरेशन’ यांची उपकंपनी सुुझुकी मोटारसायकलला इंडियाकडून नुकतीच ८० लाख समाधानी व संतुष्ठ ग्राहकांची नोंद झाली आहे. यानिमित्त कंपनी ग्राहकांच्या सन्मानार्थ विक्री व विक्री पश्चात सेवेचा उत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना भरघोस लाभ होणार आहेत, अशी माहिती सुझुकीचे सातारचे वितरक ‘गजानन सुझुकी’चे संचालक श्री. सचिनदादा शेळके यांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, ‘सुझुकी इंडिया’ने उत्कृष्ठ गुणवत्ता व विक्रेत्यांकडून दिलेल्या तत्पर विक्री पश्चात सेवा यामुळेच ८० लाख ग्राहकांपर्यंत पोहोचता आले आहे. आत्तापर्यंत बर्गमन, अ‍ॅक्सेस, अव्हेनीस, जिक्सर सिरीज, वी स्ट्रॉम एस एक्स, अशी स्कूटर व मोटारसायकलची विस्तृत रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे व त्यांना तरुणांपासून प्रौढांपर्यंत महिला व पुरूषांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या उत्सवानिमित्त नवीन सुझुकी दुचाकी खरेदी करणार्‍या ग्राहकांना विविध फायनान्स बँकेकडून ९.९९% व्याजाने कर्ज मिळणार आहे. जुन्या ग्राहकांना ८ पॉईंट फ्री चेकअप मिळणार आहे. यामध्ये ब्रेक, इलेक्ट्रिकल पार्ट, वायरिंग, बॅटरी, प्रदूषण आणि फ्युएल इंजेक्शन प्रणाली तपासणीसह इंजिन ऑइल, एअर फिल्टर, मोटारसायकल चेन, स्कूटर बेल्ट, क्लच ऑपरेशन यांच्यामार्फत तपासणी करून मिळणार आहे.

ही योजना मर्यादित कालावधीसाठी असल्याने ग्राहकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कालावधीमध्ये सुझुकी मोटारसायकलने आपली सर्व मॉडेल्स, हजर स्टॉक उपलब्ध केलेली आहेत. याचाही लाभ नवीन ग्राहकांनी घ्यावा, असे श्री. सचिन दादा शेळके यांनी सांगितले आहे.

फलटणकरांनी अधिक माहितीसाठी व दुचाकी खरेदीसाठी सुझुकी मोटरसायकलच्या जिंती नाका, फलटण येथील शोरूमला भेट द्यावी.


Back to top button
Don`t copy text!