
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
![]() |
| ऑनलाईन कलर प्रेझेंटेशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवलेली कु. अमृता यादव बक्षीस मिळालेल्या रेंजर सायकल समवेत |
स्थैर्य, कातरखटाव, दि. ०९ : येथील अमृता अनंतकुमार यादव हिने लोणंद येथील एस. टी. अॅन्ड इंग्लीश मिडीयम स्कुलच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कलर्स प्रेझेंटेशन ऑनलाईन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
तिच्या यशाबद्दल संयोजकांच्या वतीने रेंज सायकल, स्कुल बॅग व सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे. कु. अमृता ही वडूज एस. टी. आगारातील कर्तव्यदक्ष एस. टी. चालक व मनसे एस. टी. सेनेचे तालुकाध्यक्ष आनंतकुमार उर्फ आप्पासाहेब यादव यांची कन्या असून येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत आहे.
तिचे प्राचार्य एम. एम. घार्गे, उपमुख्याध्यापक सौ. गंबरे-दौंड मॅडम, पर्यवेक्षक महेश गोडसे, दिलीप फडतरे, आगारप्रमुख कुलदिप डुबल व सहकार्यांनी अभिनंदन केले.

