दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे २५ ऑटोबर २०२३ पासून आंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून फलटण तालुयातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास फलटण तालुका वडार समाज संघटना यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फलटणच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी हा पाठिंबा दर्शविला आहे.
देव, देश, धर्माच्या कार्याने मराठा समाज कायम धर्मरक्षक म्हणून उभा ठाकला. अशा पराक्रमी, स्वाभिमानी मराठ्यांसोबत फलटण तालुका वडार समाज संघटना कायम उभी राहणार आहे.
पाठिंबा देताना समाजाचे राम मोहन काळे, आशिष जाधव, उमेश यमपुरे, हर्षल पेटकर, प्रशांत मुंजाळ, अक्षय खवले, शिवा खवले, रवी खवले, सूरज माने, विकास गुंजाळ, आर्यन पवार, अमित पवार, यश पवार, भारत माने, अविनाश पेटकर, राहुल ननावरे, सचिन गुंजाळ, दत्तात्रय विटकर, प्रवीण विटकर, शहाजी तांदळे, राहुल गुंजाळ, गणेश रणवरे, गणेश विटकर, अर्जुन पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.