सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला जैन समाजबांधवांचा पाठिंबा


दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण येथील सकल मराठा समाजातर्फे आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास सकल जैन समाज फलटणकडून समक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून जैन समाजातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक सागर शहा, युवा उद्योजक ओंकार शहा वाठारकर, प्रीतम शहा वडूजकर, धीरेन शहा, राजेंद्र कोठारी-बुधकर, अमोल आणि अतुल कोठडीया, अजितभाई दोषी, रजुभाई शहा, सचिन शहा, हर्षद गांधी आदी जैन समाजातील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.


Back to top button
Don`t copy text!