फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात व विभागात प्रथम, तर राज्यात १९ व्या क्रमांकावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र शासन पणन संचलनालयाकडून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे स्टेट लेव्हल रँकिंग २४ ऑटोबर रोजी जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात व विभागात प्रथम तर राज्यात १९ वा क्रमांक मिळवून टॉप २० मध्ये स्थान प्राप्त केले आहे. याबद्दल बाजार समितीचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

यासंदर्भात बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण-खंडाळा तालुयाचे माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या दूरद़ृष्टीची व लोकोध्दाराची प्रेरणा घेऊन विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य करीत आहे. शेतकर्‍यांच्या विविध शेतीविषयक समस्यांची सोडवणूक करून शेतमालाला जास्तीत जास्त दर आणि आवक आणणार्‍या शेतकर्‍यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित फलटण तालुयात अलीकडच्या काळात अवतरलेल्या दुसर्‍या हरितक्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतमालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्था देऊन फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करण्यासाठी मी व माझे सहकारी संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बाजार समिती सदैव तत्पर राहिलेली आहे.

बाजार समिती अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी उत्कृष्ट साथ दिल्याबद्दल सर्व शेतकरी, अडते, खरेदीदार व्यापारी, हमाल मापाडी, वाहनचालक व इतर घटक, बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, व्हा.चेअरमन भगवानराव होळकर आणि सर्व सहकारी संचालक मंडळ, समितीचे सचिव श्री. शंकरराव सोनवलकर आणि त्यांचे सहकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय व उत्तम टीमवर्कच्या माध्यमातून बाजार समितीच्या विकासाचा आलेख चढता ठेवला आहे.

बाजार समितीने शेतकरी हितास्तव कामकाज करत जिल्ह्यात व विभागात प्रथम क्रमांक मिळवून स्टेट रँकिंगमध्ये टॉप २० मध्ये स्थान प्राप्त केले असल्याने श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!