पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा सातार्‍यात सन्मान


दैनिक स्थैर्य | दि. १७ मे २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक, २०२२-२३ या वर्षात उल्लेखनीय काम करणारे पोलीस अधिकारी समीर शेख यांचा सन्मान नुकताच सातारा या ठिकाणी करण्यात आला.

जिल्ह्यात अवैद्य धंदे, चोर्‍या याबाबतीत कडक कारवाई केल्याबद्दल तसेच अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य तसेच समाजात चांगल्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सातारा जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून होत असल्याने समीर शेख यांचा गौरव करण्यात आला.

पत्रकार प्रशांत सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे आणि निवृत्त नायब तहसीलदार बबनराव करडे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!