दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील मलवडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुनीता तरडे विजयी झाल्या आहेत.
फलटण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी काल, रविवारी मतदान झाले होते. त्यापैकी मलवडी येथे चुरशीने ८६.९२ टक्के मतदान झाले होते. आज, सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. थोड्या वेळातच मतमोजणी पार पडून मलवडी ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत सुनीता तरडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केले.