दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । बारामती ।
रविवार ११ जून रोजी जळोची येथील प्रेरित फाऊंडेशनच्या वतीने विविध गटातील विद्यार्थ्यांची जळोची माळी मळा येथे सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गीतांजली शिंदे या होत्या.अक्षरावरून व्यक्तीचे अंतरंग उलगडते. सुंदर अक्षर हे आपल्या जीवनाचा आरसा आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपले अक्षर अधिक-अधिक कसे सुंदर काढता येईल यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत ज्यामुळे आपले जीवनही सुंदर बनेल व शालेय व महाविद्यालय जीवनात उत्कृष्ट अक्षर उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी सहकार्य करत असल्याचे प्रा प्रिया जमदाडे यांनी सांगितले.
सुंदर अक्षर व पुस्तक वाचन नाण्याच्या दोन बाजू असून त्याची सेवा केल्यास सुंदर यश मिळतेच असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. गीतांजली शिंदे यांनी सांगितले.
यावेळी दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचेही सत्कार करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा. मनोहर जमदाडे, श्री. विजय जमदाडे, धनंजय जमदाडे, विजय फरांदे, निखिल होले, विकेश होले, संतोष जमदाडे आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोहर जमदाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार धनंजय जमदाडे यांनी मानले.