
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । करंजे तर्फ सातारा येथे एकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दि. १ मे रोजी घडली. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबत सातारा शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ रोजी साडेतीन वाजण्याच्या पूर्वी करंजे तर्फ सातारा येथील हॉटेल साईराज मधील रुम क्रमांक १०१ मध्ये विवेक दत्तात्रय रावळ वय ३८ रा. विक्रम नगर, इचलकरंजी जि. कोल्हापूर यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर सुरेश मनोहर तपासे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.