स्थैर्य, सातारा, दि. ९: खोकडवाडी, कोडोली, ता. सातारा येथे एका वृद्धाने गळफास घेवून आत्महत्या केली. विश्वासराव ज्ञानू सावंत वय 85 रा. खोकडवाडी, पो. कोडोली, असे मृताचे नाव आहे. विश्वासराव सावंत यांनी त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे दि. 8 रोजी सकाळी 6.45 च्या नंतर आढळून आले. सातारा शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.