
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 14 : फत्यापुर (ता.सातारा) येथील युवकाने वळसे येथील डोंगरात आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. विशाल विजयसिंह घाडगे (वय.३०, रा. फत्यापुर, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वळसे गावातून डोंगरातून बिव्हिजिकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या महादेवाचा डोंगर परिसरातील वनविभागाच्या हद्दीत झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.
