
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ०५: नागठाणे- गणेशवाडी (ता.सातारा) येथे कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विलास कोंडीराम साळुंखे (वय.६५) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. १५ दिवसांपासून विलास साळुंखे हे कोरोना आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे ते गावातील पाटक नावाच्या शिवारात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांना शोधण्यासाठी घरातील लोक शिवारात गेले असता त्यांनी नायलॉनच्या दोरीने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची निदर्शनास आले. याची फिर्याद भाऊ संजय कोंडीराम साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार राजू शिंदे करत आहेत.
