
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । सातारा । येथील सदर बझार परिसरामध्ये असलेल्या सेंट पॉल शाळेसमोरील इमारतीमध्ये वृध्दाने बिल्डींगमधील लोखंडी गजाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. सदरची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २0 जानेवारी रोजी साडेसात वाजण्याच्या दरम्यान, विजय नायर वय ६० मूळ रा. केरळ सध्या सदर बझार यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची तक्रार अभिजीत बिनगुने रा. करंजेपेठ सातारा यांनी दिली.



